१०६ वर्षांच्या सुगरण आजीबाईंचे यूट्यूबवर लाखो चाहते


स्वादिष्ट पक्वानांची भारतात अजिबातच कमतरता नाही. भारतीय लोक वेगवेगळे पदार्थ अगदी तडका देऊन बनवतात. पण आंध्र प्रदेशातील अशाच प्रकारचा चवदार तडका देणारी १०६ वर्षांची मस्तनम्मा आजी या सध्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. १०६ वर्षांच्या वृद्ध मस्तनम्माने लोकांच्यापुढे आदर्श ठेवला असून ही आजी या वयातही तिच्या युट्युबवरील व्हिडिओमुळे लोकप्रिय झाली आहे. मस्तनम्मा ही जगातील वयोवृद्ध युट्युबर बनलेली आहे. तिचे हे चॅनेल तिचा नातू लक्ष्मण सांभाळत असतो.

अगदी निसर्गरम्य ठिकाणी आंध्र प्रदेशच्या गुडिवाडा गावाची ही आजी जेवण बनवते. आपल्या स्वादिष्ट जेवण आणि काम करण्याच्या पद्धतीसाठी मस्तनम्मा सुप्रसिद्ध होत आहे. त्या अत्यंत गुणवत्तापूर्ण पद्धतीने चुल्ह्यावर अप्रतिम असे जेवण बनवते. तिच्या या स्वयंपाकाच्या कलेचा प्रसार ही आजी युट्यूबद्वारे जगभर करत आहे. यूट्यूबवर मस्तानम्मा यांचे ‘country food’नावाने चॅनेल आहे. यूट्यूबवर त्यांच्या स्वयंपाकाचे विविध ११७ व्हिडिओ आहेत. त्यांच्या जेवणाची चव चाखण्यासाठी त्यांचे चाहते जगभरातून येत असतात. अम्मा पारंपरिक पद्धतीने अतिशय लज्जतदार जेवण बनवते. या वयात त्या मासे, चिकन आदी पदार्थ तयार करते. अगदी देशी पद्धतीचे शाकाहारी, मांसाहारी जेवण मस्तनम्मा बनवतात. अम्मा यांच्या स्वयंपाकाची पद्धत सराईत आचाऱ्यापेक्षा कमी नाही. यांच्या जेवणापेक्षाही त्यांच्या चाहत्यांना ते बनवण्याची पद्धत अधिक आवडते. समुद्री जेवण बनवण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. ती त्यांची खासियतच आहे. समुद्री पदार्थाच्या एकाहून एक सरस अशा पद्धती त्यांना ज्ञात आहे.

लोक मस्तानम्माला प्रेमाने नानी म्हणतात. त्यांच्या परिवारात मुलगा, सून आणि नातू आहे. त्यांना युट्यूबवर वलय प्राप्त करून देण्याचे श्रेय त्यांच्या नातवाला जाते. जेवण बनवण्यात लक्ष्मण त्यांची मदत करतो. त्याला रेकॉर्ड करून तो युट्यूबवर अपलोड करतो. युट्यूबवर त्यांच्या फिश डिश आणि अंडा डोसाला अनेक लोकांची पसंती मिळते.

Leave a Comment