नवी दिल्ली : देशातील वस्तू आणि सेवांच्या किंमतीत जीएसटी लागू झाल्यानंतर महत्त्वाचे बदल झाले असून या वस्तू आणि सेवा महाग ज्यांच्यासाठी झाल्या आहेत ते आपला राग विविध माध्यमातून व्यक्त करत आहेत. अशावेळी आधीच्या आणि आताच्या वस्तूंच्या किंमतीत किती बदल झाला हे वस्तूनिहाय सर्वांना माहीत असणे गरजेचे असून महसूल सचिव हसमुख अधिया यांनी उत्पादकांना वृत्तपत्रांमध्ये जाहिरातीद्वारे जुन्या व नव्या किंमतीची माहिती देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
उत्पादकांनी वस्तूच्या जुन्या व बदललेल्या किंमती जाहिरातीद्वारे कळवा
त्यांनी जीएसटीनंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. शिवाय वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीवर सरकारची करडी नजर असणार आहे हे स्पष्ट केल्यामुळे जीएसटीच्या नावाखाली जनतेची होणारी फसवणुक टळु शकणार आहे. सरकारची वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीवर करडी नजर असणार आहे. जीएसटीच्या नावाखाली जनतेची फसवणूक होऊ नये हे यामागचे महत्वाचे उद्दीष्ट्य आहे. देशात १५ विभागांच्या सचिवांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती प्रत्येक स्तरावर देखरेख करत आहे. शिवाय जिल्हापातळीवरही १७५ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक अधिकाऱ्याकडे ४-५ जिल्ह्यांची जबाबदारी असेल, अशी माहिती महसूल सचिव हसमुख अधिया यांनी दिली.