मुंबई : रिलायन्स जिओने धन धना धन ऑफर संपण्यापूर्वीच ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर आणली असून यापूर्वीच धमाकेदार ऑफर देऊन रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांची झोप उडवली आहे. पण आता आता ही नवीन ऑफर आणून कंपनीने इतर कंपन्यांपुढे आव्हान उभे केले. जिओ नवीन देऊ केलेल्या ऑफरमध्ये २२४ जीबीपर्यंत ४जी डेटा देणार आहे.
धन धना धन ऑफर संपण्यापूर्वीच ‘जिओ’ची नवी ऑफर
जिओची ‘धन धना धन ऑफर’ चालू महिन्यात (जुलै) संपणार आहे. त्यामुळे आता जिओच्या ग्राहकांना सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला रिचार्ज करावे लागणार आहे. आता नवीन प्लॅन घेण्यासाठी ग्राहकांना नवीन जिओ फाय किंवा नवीन सिम खरेदी करावे लागणार आहे. यासाठी ग्राहकांना ९९ रुपयांची प्राईम मेंबरशिप देण्यात येणार आहे. त्यानंतर १४९, ३०९ आणि ५०९ या पैकी एका प्लॅनची निवड करावी लागणार आहे.
असे आहेत जिओचे नवीन प्लॅन:
१४९ प्लॅन – ग्राहकाला १४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दर महिन्याला २ जीबी ४ जी डेटा एक वर्षापर्यंत मिळणार आहे. शिवाय यासाठी १२ विनामूल्य रिचार्ज सायकल असेल.
३०९ प्लॅन – ग्राहकाला ३०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी ४ जी डेटा ६ महिने मिळणार आहे. यामध्ये २८ दिवसाच्या रिचार्जच्या हिशोबाने ६ मोफत रिचार्ज सायकल असेल. म्हणजेच ग्राहकाला १६८ जीबी डेटा मिळणार आहे.
५०९ प्लॅन – ग्राहकाला ५०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ४ महिने रोज २ जीबी ४ जी डेटा मिळणार आहे. यासाठी ४ रिचार्ज सायकल असतील. म्हणजेच ५०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २२४ जीबी डेटा मिळणार आहे.