टेस्लाची मॉडेल थ्री शुक्रवारी लाँच होणार


टेस्लाची बहुप्रतिक्षित मॉडेल थ्री इलेक्ट्रीक कार अखेर २८ जुलैला शुक्रवारी लाँच केली जात आहे. या संदर्भात कंपनीचे अध्यक्ष एलन मस्क यांनी ट्वीटरवर दिलेल्या मेसेजनुसार या कारसाठी आवश्यक असलेल्या सर्व सरकारी परवानग्या अपेक्षेपेक्षा दोन आठवडे अगोदरच मिळाल्याने पहिली कार २८ जुलैला शुक्रवारी लाँच केली जाणार आहे. टेस्लाच्या मॉडेल्सपैकी ही सर्वात स्वस्त कार आहे. तिची किंमत आहे २७५०० डॉलर्स म्हणजे साधारणपणे २२ लाख रूपये.

ही पाच आसनी कार एकदा पूर्ण चार्ज केली की ३४६ किमीचे अंतर कापू शकते. ० ते १०० किमीचा वेग घेण्यास तिला ६ सेकंद लागतात. ऑगस्टपर्यंत कंपनी १०० कार तयार करणार आहे. हीच संख्या सप्टेंबरमध्ये १५०० वर व त्यानंतर दर महिना २० हजार कार्सवर नेली जाणार आहे. या कारसाठी आत्ताच ५ लाख युनिटची नोंदणी झाली असल्याचेही समजते. अर्थात पूर्व नोंदणी केलेल्या सर्वांना ही कार मिळेपर्यंत २०१८ साल उजाडणार आहे. कंपनीला मोठ्या संख्येने कार उत्पादन करण्याचा अनुभव नाही. गतवर्षी कंपनीने ८४ हजार कार्सचे उत्पादन केले होते.

Leave a Comment