स्नॅपडीलने फ्लिपकार्टची ५५०० कोटींची ऑफर धुडकावली


ई कॉमर्स कंपन्यांच्या स्पर्धेला तोंड न देता आल्याने नुकसान सोसत असलेल्या स्नॅपडीलच्या संचालक मंडळाने कंपनी खरेदीची फ्लिपकार्टने दिलेली ५५००कोटींची ऑफर धुडकावली आहे. संचालक मंडळाच्या म्हणण्यानुसार कंपनीचा जो अहवाल आत्ता आला आहे त्यानुसार फ्लिपकार्टची ८० ते ९० अब्ज डॉलर्स म्हणजे साधारण ५५०० कोटी ही रक्कम खूपच कमी आहे. अर्थात पहिली ऑफर नाकारली गेली असली तरी दोन्ही कंपन्यातील बोलणी सुरूच राहिली आहेत असेही समजते.

सॉफट बँकेने स्नॅपडीलमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे व ही कंपनी स्नॅपडीलच्या विक्रीबाबत गेले काही महिने सक्रीय झालेली आहे. स्नॅपडीलचे संस्थापक कुणाल बेहेल व रोहित बंसल संचालक मंडळावर आहेत. अमेझॉन व फ्लिपकार्टची स्पर्धा करावी लागत असल्याने स्नॅपडीलला नुकसान सोसावे लागते आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये स्नॅपडीलचे व्हॅल्यूएशन ६.५ अब्ज डॉलर्स केले गेले होते. दरम्यान सॉफ्ट बँकेने कंपनीतील त्यांची पूर्वीची गुंतवणूक १ अब्ज डॉलर्सने घटविली आहे.

Leave a Comment