४ जी स्पीडमध्ये रिलायन्स जिओ अव्वल


नवी दिल्ली : रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात इतर सर्व कंपन्यांना मागे टाकले आहे. रिलायन्स जिओकडे अनेक कंपन्यांचे ग्राहक जात आहेत. जिओ इतर सर्व कंपन्या यापासून हैराण असतानाच नवीन ऑफर आणून ग्राहकांना आकर्षित करत आहे. रिलायन्स जिओने ग्राहकांना स्पीडच्या बाबतीत समाधानी केले आहे. ४जी स्पीडच्या बाबतीत रिलायन्स जिओने इतर कंपन्यांना मागे सोडले आहे. ट्रायच्या अहवालानुसार रिलायन्स जिओ ४ जी स्पीडच्या बाबतीत लागोपाठ पाचव्या आठवड्यात पहिल्या स्थानावर आहे.

Leave a Comment