देशातील युवा पिढीशी मोदी पुस्तकाच्या माध्यमातून करणार मैत्री


पंतप्रधान मोदी देशातील युवा पिढीशी ते लिहित असलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदींचे हे पुस्तक या वर्षअखेर प्रकाशित केले जात असून जगप्रसिद्ध पेंग्विन रँडमहाऊस तर्फे ते प्रकाशित केले जाणार आहे. एकाच वेळी अनेक भाषांतून हे पुस्तक वाचकांना उपलब्ध होणार आहे.

या पुस्तकात मोदी विशेषतः १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांशी परिक्षेचा ताण, तयारी, परिक्षा काळात कसा धीर ठेवायचा व परिक्षेनंतर काय काय कामे करता येतील याविषयी संवाद साधणार आहेत. तसेच बच्चे दोस्तांसाठी परिक्षेच्या तयारीला मदत करणार आहेत. ही मदत गप्पा गोष्टी स्वरूपात असेल तसेच परिक्षेतील गुणांपेक्षा किती ज्ञान मिळविले याला अधिक महत्त्व देण्याचा सल्लाही देणार आहेत. पंतप्रधानांच्या मन की बातला अपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर स्वतः मोदींनाच ही पुस्तकाची कल्पना सचल्याचे समजते.

विद्यार्थी हा मला फार जवळचा विषय आहे असे सांगून ते म्हणतात, पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधतानाच माझे सिद्धांत युवकांच्या माध्यमातून मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. भविष्यात युवकांनी नेतृत्त्व करण्यात आघाडीवर असले पाहिजे असे माझे स्वप्न आहे असेही मोदींनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment