सत्तेवर येण्याअगोदर पंतप्रधान मोदी निवडणूक प्रचारात ते बालपणी त्यांच्या वडीलांसोबत वननागर रेल्वे स्टेशनवर चहा विकत असत ही आठवण वारंवार सांगत असत. हीच चहाची टपरी आता पर्यटनस्थळ म्हणून विकसित केली जाणार आहे. गुजराथच्या वडनागर रेल्वे स्टेशन व आसपासच्या परिसराच्या विकासासाठी सांस्कृतिक व पर्यटन मंत्रालयाने निधी दिला आहे त्यातील आठ कोटी या स्टेशन परिसर विकासासाठी वापरले जाणार आहेत.
मोदींच्या बालपणीची चहाची टपरी होणार पर्यटन स्थळ
केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री महेश शर्मा म्हणाले, वडनागर हे पंतप्रधानांचे जन्मगांव आहेच पण ऐतिहसिक दृष्टीनेही या गावाचे विशेष महत्त्व आहे. येथे प्रसिद्ध शर्मिष्ठा सरोवर व प्राचीन विहीर आहे तसेच पुरातत्त्व विभागाच्या उत्खननात बौद्ध मठाचे अवशेषही सापडले आहेत. तेथे अजूनही उत्खनन सुरू आहे. हे गाव जगाच्या नकाशावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. वडनागर रेल्वे स्थानकातील चहाच्या टपरीचे मूळ रूप तसेच ठेवून त्याला आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या परिसराचा भारतीय पुरातत्त्व विभाग अधिकारी व महेश शर्मा यांनी नुकताच दौरा करून पाहणी केली आहे.