भारताचा जीडीपी समाधानकारक नाही: राहुल बजाज


नवी दिल्ली: भारताचा ‘जीडीपी’चा ७. १ हा वृद्धी दर इतर विकसित राष्ट्रांपेक्षाही अधिक असला तरी तो अपेक्षा पूर्ण करण्याएवढा समाधानकारक नाही; अशी खंत बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी व्यक्त केली.

भागधारकांसमोर कंपनीच्या सन २०१६-१७ चा वार्षिक अहवाल सादर केल्यानंतर ते बोलत होते.

सन २०१६-१७ मध्ये वृद्धी दरात उत्साहवर्धक वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र सध्याची परिस्थिती पाहता अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्याचे दिसून येते; असे बजाज यांनी नमूद केले. मागील ४ ते ५ वर्षांपासून गुंतवणूकीचा अभाव, बँकांच्या कर्जवसुलीतील अडचणींमुळे कर्ज पुरवठ्यात निर्माण झालेल्या समस्या, उद्योगांकडून नव्या गुंतवणुकीबाबत उदासीनता आणि त्यातच नोटबंदीची पडलेली भर; यामुळे वृद्धीदराने अपेक्षित उंची गाठली नाही; असे त्यांनी संगितले.

भारताचा वृद्धीदर विकसित देशांपेक्षा आणि वेगाने विकसित होणाऱ्या चीनपेक्षाही अधिक आहे; यात काहीच शंका नाही. मात्र हाच दर सन २०१५-१६ मध्ये ७.९ एवढा होता. देशाने वेगाने विकास केला केला आहे; हे निश्चित! मात्र दरवर्षी ७.५ ते ८ पर्यंत राखण्यासाठी मोठी मजल मारावी लागणार आहे; याकडे बजाज यांनी लक्ष वेधले.

Leave a Comment