महिलांसाठी व्हायग्रा


सध्याच्या धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनामध्ये महिलांची कामप्रेरणा हळूहळू मंदावत चाललेली आहे. त्यामुळे ती वाढवणार्‍या व्हायग्रा या वनस्पतीची महिलांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी केली जात आहे. महिलांची कामप्रेरणा कमी होण्यामागे शरीरातील हार्मोन्सचा असमतोल, तणाव, थकवा, नातेसंबंधातील समस्या आणि विविध औषधांचे परिणाम यांचा समावेश होतो. अशावेळी व्हायग्राची मागणी येणे साहजिक आहे. वास्तविक पाहता व्हायग्राचीसुध्दा रिऍक्शन येत असते. पण ते माहीत असूनसुध्दा महिलांकडून व्हायग्रा मागितला जात आहे. व्हायग्रा वनस्पती त्यांच्या शरीरातील हार्मोन्सच्या असमतोलावरसुध्दा गुणकारी ठरू शकते.

महिलांमध्ये चाळीशी गाठण्याच्या आतच रजोनिवृत्तीची चिन्हे दिसायला लागली आहेत. मात्र व्हायग्रा वनस्पतीमुळे आणि विशेषतः या वनस्पतीतील फायटो एस्ट्रोजिन्समुळे लवकर येणारी रजोनिवृत्ती टळू शकते. वास्तविक पाहता आशिया खंडाच्या विविध देशांमध्ये व्हायग्रा वनस्पती ही विविध आजारांवर गावठी इलाज म्हणून वापरली जात आहे. या वापराची परंपरा एक हजार वर्षांपासूनची आहे. स्त्री-पुरुषातील शारीरिक संबंधात निर्माण होणार्‍या काही समस्या आणि नपुंसकता यावरही ही वनस्पती गुणकारी असल्याचे मानले जाते. स्त्रियांची कामप्रेरणा वाढवणे आणि त्यामुळे येणारा स्नायूंवरचा तणाव कमी करणे असेही व्हायग्राचे उपयोग आहेत.

या व्यतिरिक्त दमा, डिप्रेशन त्याचबरोबर मासिक पाळीतील त्रास हेही व्हायग्रामुळे कमी होतात. व्हायग्रा अशा रितीने कशी उपयोगी पडते यावर संशोधन केले असता व्हायग्राच्या सेवनाने ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला आणि शरीराच्या आतील अवयवांना अधिक प्रमाणात होतो असे दिसून आले. भारतामध्ये अशाच प्रकारे कामोत्तेजन देण्यासाठी अश्‍वगंधा नावाची वनस्पती वापरली जाते. या वनस्पतीनेसुध्दा कामोत्तेजना वाढण्याबरोबरच दमाही नियंत्रणात आणला जातो. तणावही कमी होतो. याच कामासाठी वापरले जाणारे दुसरे औषध म्हणजे रेड वाईन. या रेड वाईनवर काही वेळेला संशोधन केले गेले आहे आणि असे आढळले आहे की ज्या स्त्रिया रेड वाईनचे प्राशन करतात त्या लैंगिकदृष्ट्या अधिक सक्रीय असतात. रेड वाईनमुळे रक्त प्रवाह वेगाने धावायला लागतो आणि त्याचाच परिणाम होऊन त्याचे प्राशन करणारी स्त्री अधिक सक्रीय होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment