नवी दिल्ली – ३१ जुलैनंतर पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) ग्राहकांचे मायस्ट्रो डेबिट कार्ड बंद होणार आहेत. बँकेने हा निर्णय ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी घेतला असून एका वृत्तसंस्थेने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, आपले जुने मायस्ट्रो डेबिट कार्ड ग्राहकांना नव्या ईएमव्ही चिप असलेल्या कार्ड्समध्ये बदलवून घ्यावे लागणार आहे. असे न केल्यास जुने कार्ड ब्लॉक होतील आणि फक्त नवे ईएमव्ही चिप असलेले कार्डच चालू राहतील. बँक हे कार्ड बदलून घेण्यासाठी कोणतेही शूल्क आकारणार नाही. आरबीआयच्या २०१५ मध्ये जारी करण्यात आलेल्या सल्ल्यानुसार कार्ड बदलण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. आरबीआयने आपल्या अॅडव्हायजरीमध्ये सर्व बँकांना सुरक्षिततेसाठी ईएमव्ही चिप असलेले कार्ड जारी करण्यास सांगितले होते. बँक ग्राहकांना कार्ड बदलण्यासाठी एसएमएसच्या माध्यमातून याची माहिती देत आहे.
३१ जुलै नंतर बंद होणार पीएनबीचे डेबिट कार्ड
कार्ड बदलण्याची गरज असलेले सुमारे एक लाख ग्राहक बँकेने शोधून काढले असून पीएनबीकडे सुमारे ५.६५ कोटी कार्ड धारक आहेत. बँकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका वर्षांत एकदाही आपल्या जुन्या मायस्ट्रो डेबिट कार्डचा वापर ज्यांनी केलेला नाही. या निर्णयापासून त्यांना दूर ठेवण्यात येणार आहे.