निवडणूक आयोगाची फेसबुकवरून मतदार नोंदणी


निवडणूक आयोगाने देशातील जास्तीत जास्त नागरिक मतदार म्हणून नोंदविले जावेत यासाठी सोशल साईट फेसबुकचा वापर करण्यास सुरवात केली आहे. आयोगाने १ जुलै रोजी मतदार होण्यासाठीच्या सर्व बाबींची पूर्तता करणार्‍या भारतीय नागरिकांसाठी फेसबुक व्होटर रजिस्टर रिमाईंडर संदेश दिला आहे.त्यासाठी वेबसाईटवर रजिस्टर नाऊ नावाने बटण तयार केले गेले असून त्यावर क्लिक करताच मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू होऊ शकणार आहे.

भारतातील १ कोटी ८० लाख नागरिक फेसबुकशी संबंधित आहेत. निवडणूक आयुक्त नसीम जैदी म्हणाले, नव्या मतदारांसाठी हे विशेष अभियान सुरू केले गेले आहे. कांही कारणाने मतदार यादीत नांव नोंदणी करण्याचे राहून गेले असेल तर त्यांच्यासाठी हे अपील आहे. येथूनही नवे मतदार त्यांच्या नावाची नोंदणी करू शकणार आहेत. हा संदेश इंग्लीश, हिंदी, गुजराथी, मराठी, पंजाबी, बंगाली, कानडी, मल्याळी, तमीळ, तेलगू, उर्दू, आसामी अशा १३ भाषांतून दिला गेला आहे.

Leave a Comment