अझरबैजान- ज्वालामुखीवर वसलेला देश


निसर्ग निर्मित प्रेशर कुकर अशी ओळख असलेल्या अब्शरा द्विपावर वसलेला मध्य आशियाई अझरबैजान हा देश अक्षरशः अग्नीवर वसलेला देश आहे. जगातील सर्वात मोठे सरोवर या नावाने ओळखल्या जाणार्‍या कॅस्पियन सागरला लागून असलेल्या या देशाची राजधानी बाकू हे अतिशय सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. सगळ्यात मजेची बाब म्हणजे या शहरात दररोज संध्याकाळी बाहेरचे जेवण घेण्याची प्रथा पाळली जाते. म्हणजे शहरातील एकूण एक लोक घरी स्वयंपाक न करता बाहेरच जेवतात. त्यामुळे कोणत्याही रस्त्यावर फिरताना खरपूस रोटीचा सुगंध भूक आणखी चाळवितो असा अनुभव येतो.


या देशाचे वैशिष्ठ म्हणजे येथील जमिनीतून कधीही ज्वाळा बाहेर पडतात. चिखलातले ज्वालामुखी कधीही स्फोट पावतात.येथील जमिनीखाली जगातील सर्वात मोठे नैसर्गिक वायूचे भंडार असून तेथे मिथेनचे प्रमाण वाढले की गॅस बाहेर पडतो. या भागात चिखलात अंदाजे ४०० ज्वालामुखी आहेत व त्यांचे कधीही स्फोट होत असतात. तरीही या भागात हजारो वर्षांपासून मानवी वस्ती आहे. बाकूपासून ६४ किमी वर असलेले गोंबुस्ता रॉक आर्टिकल्चरल लँडस्केप युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेले आहे. येथे दगडातून बनलेल्या कलाकृती आहेत व त्यांचे वय पाच वर्षांपासून ४० हजार वर्षांपर्यंत आहे.


दोन हजार वर्षांपूर्वी येथे पारशी धर्माची स्थापना झाली. पारशी लोक अग्नीलाच ईश्वर मानतात. जमीनीतून आपोआप वर येणारा अग्नी ते पवित्र मानतात. येथील आतिशगाह नावाचे फायर टेंपल पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. संपूर्ण शहरात आगीच्या ज्वालांची आठवण देणारे फायर टॉवर उभारले गेले आहेत. या देशाला प्राचीन सांस्कृतिक परंपरा असून प्राचीन कालापासून येथील नागरिक हिंदू, मुस्लीम व्यापार्‍यांशी व्यापार करत होते असेही सांगितले जाते.

Leave a Comment