शेतक-यांना जीएसटी परिषदेने दिली दिलासा देणारी बातमी


नवी दिल्ली – जीएसटी परिषदेने फर्टिलायजरवरील करात मोठ्या प्रमाणावर कपात केली असून १२ टक्क्यांवरून हा कर ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. शेतक-यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

जीएसटीमधील १२ टक्के टॅक्स स्लॅबमध्ये रासायनिक खतांना ठेवण्यात आल्यामुळे देशभरातून विविध प्रतिनिधींनी हा कर कमी करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता, रासायनिक खतांवर आकारण्यात आलेला १२ टक्के कर रद्द करुन तो आता ५ टक्के करण्यात आला आहे.

फर्टिलायजरवरील कर जीएसटी लागू झाल्यानंतर १२ टक्के होणार होता. त्यामुळे शेतीशी निगडीत सर्व साधने महाग होणार असल्याने त्याचा फटका बसणार होता. मात्र, आता जीएसटी परिषदेने घेतलेल्या निर्णयामुळे खत, बी-बियाणे, टॅक्टरचे सुटे पार्ट यापासून ते शेतीसाठी लागणा-या अवजारे स्वस्त होणार आहेत.

आता राज्यांमध्ये या निर्णयामुळे जीएसटीनुसार फर्टिलायजरवर कमीत कमी शुन्य ते 6 टक्क्यांपर्यंतचा कर आकारला जाणार आहे. रासायनिक खतांवरील कर कमी करण्यात आल्याने त्याचा फायदा निश्चितच शेतक-यांना होणार आहे. जीएसटी लागु झाल्यानंतर एक देश, एक कर, एक बाजारपेठ ही रचना अस्तित्त्वात येणार आहे. या निर्णयामुळे देशाच्या विकासात आमुलाग्र परिवर्तन होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. निरनिराळ्या प्रकारच्या करांमुळे व्यापार क्षेत्राची यापूर्वी अडचण होत होती. जीएसटीमुळे सर्व कर संपुष्टात येऊन देशात एकच करप्रणाली लागू होईल असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment