इंडिगोची एअर इंडिया खरेदीची तयारी


मार्केट शेअरमध्ये नंबर वन वर असलेल्या इंडिगोने एअर इंडिया विमान कंपनीची खरेदी करण्यात रस दाखविला आहे. नागरी विमानवाहतूक विभागाचे सचिव आर.ए. चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या कॅबिनेटने एअर इंडियामधील सरकारचा हिस्सा काढून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर इंडिगोने ही विमान कंपनी खरेदी करण्याची तयारी दाखविली आहे. टाटा ग्रुपनेही एअर इंडियाच्या खरेदीत रस दाखविल आहे.

एअर इंडियाच्या ताफ्यात सध्या ११८ विमाने आहेत. न्यूयॉर्क, शिकागो, लंडन येथे कंपनीचे पार्किंग स्लॉट आहेत. मुबंई विमानतळावर सकाळच्या वेळात कंपनीचे १८ डिपार्चर स्लॉट आहेत. कंपनीच्या वाढत चाललेल्या कर्जबोज्यामुळे सरकारने यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर २०१४ मध्ये एअर इंडियात सरकारने १६ हजार कोटी रूपये गुंतविले होते मात्र आता आणखी मोठी जोखीम उचलण्याची सरकारची तयारी नाही असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment