‘रॉयल एनफील्ड’चे बदलले रुपडे


नवी दिल्ली : फ्रान्समध्ये सुरु असलेल्या २०१७ विल्ज अॅन्ड एग्झिबिशनमध्ये रॉयल एनफील्डने दोन कस्टमाईज बाईक सादर केल्या आहेत.

या ‘रॉयल एनफिल्ड’च्या बाईक आहेत हे लोकांना पाहिल्या पाहिल्या ध्यानातही आले नाही. या बाईक म्हणजे परदेशी बनावटीच्या लाखो रुपयांच्या घरात किंमती असलेल्या महागड्या बाईक असेल्याचे अनेकांना वाटले. लंडन बेस्ड कस्टम कंपनी सिनरोजा मोटरसायकल्सने रॉयल एनफिल्डच्या या बाईक्स कस्टमाईज केल्या आहेत. रॉयल एनफिल्डच्या या बाईक अतिशय शानदार पद्धतीने दमदार अशा कस्टमाईज्ड करण्यात आल्या आहेत.

कंपनीने रॉयल एनफील्ड हिमालयन (Royal Enfield Himalayan) मधून बनलेली जेंटलमेन ब्रॅट (Gentleman Brat) आणि रॉयल एनफील्ड कॉन्टीनेंटल (Royal Enfield Continental GT) मधून बनवलेली सर्फ रेसर (Surf Racer) या दोन बाईक सादर केल्या. सर्फ रेसरमध्ये ओरिजिनल ५३५ सीसी इंजिन आहे. यामध्ये मशीन्ड पिस्टन बॅरल्स जोडले आहेत. सोबतच रॉयल एनफिल्ड हिमालयन जेंटलमन ब्रॅटची सीट कस्टमाईज्ड करण्यात आली आहे. जेंटलमेन ब्रॅटमध्ये टेल माऊंटेन एग्जॉस्ट केनिस्टर दिले गेले आहे. या बाईकमध्ये गोल हेडलाईट आणि इंडिकेटर्स याला रेट्रो लूक देतात. बाईकची फ्रेम छोटी करण्यात असल्यामुळे या बाईकचा चेहरा-मोहराच बदलून गेला आहे.

Leave a Comment