‘चना’ आणि ‘चना दाल’ ऑक्सफर्ड डिक्शनरीत


आता दोन नवीन शब्दांचा समावेश ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये करण्यात आला आहे. ‘चना’ आणि ‘चना दाल’ या दोन नवीन शब्दांचा समावेश केला गेला आहे. या डिक्शनरीमध्ये दर तीन महिन्यांच्या कालावधीनंतर अनेक नव्या शब्दांचा समावेश करण्यात येतो. यावेळी यात दोन नवीन शब्दांना स्थान मिळाले आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीत यापूर्वी ‘यार’,’ चुडीदार’, ‘भेळपुरी’, ‘पापड’, ‘पटेल’ यासारख्या शब्दांचा समावेश करण्यात आला होता.

या डिक्शनरीत यंदा किराणा मालाशी संबधित ८० हून अधिक शब्दांची भर घातली आहे. यात हा शब्द नेमका कुठून आलाय आणि त्याची विस्तृत माहितीही देण्यात आली आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीत याव्यतिरिक्त टेनिससंबंधित काही शब्दांचाही समावेश करण्यात आला आहे. यात ‘फोर्स्ड एरर’ आणि ‘बेगल’ या शब्दांना स्थान मिळाले आहे. शिवाय, ‘वोक’ आणि ‘पोस्ट ट्रूथ’ यांसारख्या शब्दांचाही समावेश करण्यात आला आहे. ऑक्सफर्डने यावेळी ६०० हून अधिक नवीन शब्दांचा डिक्शनरीत समावेश केला आहे.

Leave a Comment