व्यंकय्या नायडूंचा जीएसटीवरुन मोदी सरकारला घरचा आहेर


नवी दिल्ली: केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कर लागू केला. पण स्वत: सरकारनेच ही करप्रणाली लागू झाल्यावर अडचणी वाढणार असल्याची कबूली दिली आहे. ही माहिती केंद्रीय शहरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. केंद्र सरकारडून जीएसटीबाबत अडचणींविषयी देण्यात आलेली ही पहिलीच कबूली आहे. केंद्रातील कोणत्याच मंत्री अथवा नेत्याने यापूर्वी जीएसटीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचे वास्तव कबूल केले नव्हते. पण व्यंकय्या नायडू यांनी यावरून सरकारला घरचा आहेर दिला आहे.

जीएसटीचे जोरदार समर्थन करताना जीएसटीमुळे महागाईत वाढ होईल हा दावा म्हणजे मुर्खपण असल्याचे केंद्रीय अर्थराज्य मंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटले होते. अमेरिका दौऱ्यावर असलेले नरेंद्र मोदी हे तेथील गुंतवणूकदारांना जीएसटी कसा फायदेशीर आहे हेच सांगत आहेत. पण, व्यंकय्या नायडू यांनी मात्र जीएसटीवर भाष्य करून वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात नायडू यांचे हे मत पक्ष आणि सरकार यांना किती रूचेल याबाबत अल्पावधीतच समजेल. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या स्वदेशी जागरण मंचानेही जीएसटीमुळे चीनला जास्त फायदा होईल भारताला नाही, असे म्हटले आहे.

Leave a Comment