आता मोबाईल ३ महिन्यात एकदाच करा चार्ज


आजकाल मोबाईलचा वापर प्रचंड प्रमाणात केला जात असल्याने दिवसातून किमान दोन वेळा मोबाईल चार्ज करावा लागतो. म्हणजे कुठेही एक दिवसासाठी बाहेरगावी जायचे झाले तर प्रथम चार्जर आठवणीने घ्यावा लागतो. या झंझटातून लवकरच मुक्त होण्याची संधी युजरला मिळू शकेल असे संकेत संशोधकांनी दिले आहेत. हे तंत्रज्ञान यशस्वी ठरले तर तीन महिन्यातून एकदा मोबाईल चार्ज करूनही काम भागणार आहे.

मिशिगन व कार्नेल विद्यापीठातील संशोधकांनी मॅग्नेटोइलेक्ट्रीक मल्टी फेरीक मटेरियल तयार केले आहे. यात अणुंचा पातळ थर मिर्माण करता येतो. यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते व याचा उपयोग बायनरी कोड १ व ० पाठविण्यासाठी करता येतो. यावरच संगणक काम करतात. थोडक्यात सांगायचे तर वीजेच्या छोटा भागाचा वापर डेटा रिसिव्ह व सेंड साठी करायचा. सध्याचे प्रोसेसर सेमीकंडक्टर बेस्ड सिस्टीमचा उपयोग करतात त्यामुळे त्यांना सतत करंट पुरवावा लागतो. सध्ये इलेक्ट्रॅनिक्ससाठी वैश्विक उर्जेच्या पाच टक्के उर्जा वापरली जाते हे प्रमाण २०३० पर्यंत ४० ते ५० टक्क्यांवर जाणार आहे. यामुळे नवे संशोधन भविष्यात मैलाचा दगड ठरू शकेल असा दावा संशोधक करत आहेत.

Leave a Comment