मोदींचे व्हाईट हाऊसमध्ये हार्दिक स्वागत


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्टलेडी मिलेनिया यांनी हार्दिक स्वागत केले. मोदी आणि ट्रंप यांची ही पहिलीच भेट असल्याने चीन, पाकिस्तान या देशांचे या भेटीकडे विशेष लक्ष होते. मोदी ट्रम्प यांच्यात पहिलीच बैठक होण्यापूर्वीच अमेरिकेने पाकिस्तानच्या हिज्बुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाऊद्दीन याला जागतिक दहशतवादी घोषित केल्याने एक प्रकारचा हा पाकिस्तानला अमेरिकेने दिलेला इशारा मानला जात आहे.

मोदी यांनी ट्रम्प आणि मेलेनिया ट्रंप यांनी मनापासून केलेल्या स्वागताबद्दल धन्यवाद देताना हे माझ्या देशाच्या १२५ कोटी बांधवांचे स्वागत आहे असे मी मानतो अशी भावना व्यक्त केली. तर ट्रम्प यांनी मोदी हे अमेरिकेचे खरे मित्र असल्याचे व त्यांच्यासंबंधी सतत वाचन करत असल्याचे, बोलत असल्याचे व ऐकत असल्याचे सांगितले. मोदी हे ग्रेट प्राईममिनिस्टर आहेत असेही ट्रंप म्हणाले. मोदी यांनी मोठे काम केले आहे व त्यामुळे भारत आर्थिक दृष्ट्या फारच चांगली प्रगती करत असल्याचे व त्याबददल मोदींचे अभिनंदन केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. मोदी, ट्रम्प तसेच दोन्ही देशांचे महत्त्वाचे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत दहशतवाद निपटून काढणे, उर्जा क्षेत्र, संरक्षण भागीदारी, जागतिक सहकार्य, व्यापार या संदर्भात बोलणी झाल्याचे समजते.