६ जीबी रॅमवाला हुवाईचा ऑनर ८ प्रो स्मार्टफोन भारतात लाँच - Majha Paper

६ जीबी रॅमवाला हुवाईचा ऑनर ८ प्रो स्मार्टफोन भारतात लाँच


मुंबई: ऑनर ८ प्रो हा आपला नवा स्मार्टफोन हुवाईने लाँच केला असून कंपनीने हा स्मार्टफोन या वर्षी फेब्रुवारी महिन्यात चीनमध्ये लाँच केला होता. अद्याप या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हा स्मार्टफोन जुलैपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध असेल. या स्मार्टफोनमध्ये अनेक खास फीचर्स आहेत. या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि ४००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

ड्यूल सिम असणाऱ्या ऑनलर ८ प्रोवर अँड्रॉईड ७.० नॉगट ऑपरेटिंग सिस्टम असणार आहे. यामध्ये ५.७ इंच स्क्रिन असून याचे रेझ्युलेशन १४४०×२५६० पिक्सल आहे. तर यामध्ये किरिन ९६० प्रोसेसर आणि ६ जीबी रॅम आहे. तसेच यामध्ये १२८ जीबी इंटरनल मेमरी असून २५६ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये १२ मेगापिक्सल रिअर आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये ४जी, LTE, वाय-फाय, यूएसबी पोर्ट टाइप-सी, ब्ल्यूटूथ यासरखेही ऑप्शन देण्यात आले आहेत.

Leave a Comment