रमजान, आणि ईद उल फित्र


मुस्लीम कॅलेंडरमध्ये रमजान हा सर्वात पवित्र महिना मानला जातो व रमजानमध्ये येणारी ईद हा मुस्लीमांचा सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. आज देशभरात ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून मुस्लीम भाविक एकमेकांना गळामिठी घेऊन ईदच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. सर्व जगातच जेथे जेथे मुस्लीम आहेत तेथे हा सण मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. रमाजानच्या महिन्यात पुण्यकर्म केले तर त्याचे चांगले फळ अधिक प्रमाणात मिळते असा मस्लीम बांधवांचा विश्वास आहे.

रमजान हा ३० दिवसांचा माहिना असून या काळात मुस्लीम रोजे पाळतात. म्हणजे पहाटे कांही तरी खाऊन घ्यायचे ते सहरी व सायंकाळी इमामाची बांग ऐकल्यानंतर रोजा सोडायचा. त्याला म्हणतात इफ्तार. महिना संपताना आकाशात चंद्र दिसला की त्याच्या दुसरे दिवशी ईद साजरी केली जाते. वर्षातून दोन वेळा ईद येते त्यातील रमजानमधली ईद ही ईद उल फित्र किवा मिठी ईद म्हणून साजरी होते तर दुसरी बकरी ईद म्हणून साजरी केली जाते. रमजानच्या २७ व्या रात्री शब ए कद्र म्हणजे कुराणाचे अवतरण झाले असे मानले जाते.यामुळे या महिन्यात कुराणाचे पाठ मोठ्या प्रमाणावर केले जातात. मिठी ईदसाठी शेवयांची खीर हे पक्वान्न केले जाते. शुभेच्या द्यायला येणार्‍या सर्वांना मोठ्या प्रेमाने हा शीरकुर्मा खिलविला जातो.
————-

Leave a Comment