कगाबी वन फोर जी, स्वस्तातला मस्त फोन


मोबाईल बाजारात आता फोर जी फोन चांगलेच रूळले आहेत व जिओ रिलायन्समुळे त्यांना चांगले ग्राहकही मिळत आहेत. मात्र फारशा परिचित नसलेल्या कगाबी मोबाईल्स ने आणलेला कगाबी वन हा फोन अन्य फोनच्या तुलनेत स्वस्त व अधिक दमदार फिचर्ससह आहे. हा फोन लवरकच ऑनलाईनवर विक्रीसाठी दाखल होत असून त्याची विक्री ऑनलाईन शॉपिंग साईट वर सुरू होत आहे.

या फोनला ५ इंची आयपीएस एचडी स्क्रीन डिस्प्ले दिला गेला असून हा ड्युअ्ल सिम आहे. अँड्रोईड ६.० मार्शमेलो, २ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल स्टोरेज, ८एमपीचा रियर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, फोर जी व्होल्ट, वायफाय, ब्ल्यू टूथ, मायक्रो यूएसबी पोर्ट अशी त्याला कनेक्टिव्हीटी ऑप्शन्स आहेत. याची किंमत अवघी २७०० रूपये आहे त्यामुळे हा जगातील सर्वात स्वस्त व चांगली फिचर्स असलेला फोर जी व्होल्ट फोन ठरला आहे.

Leave a Comment