देशातील अग्रणी बँक प्रमुखाला मिळतो सर्वात कमी पगार


देशातील अग्रणी आणि जगात ५० मोठ्या बँकात समाविष्ट अ्रसलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांना अन्य खासगी बँकांच्या तुलनेत फारच कमी पगार मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अरूंधती यांच्या तुलनेत खासगी क्षेत्रातील बँक प्रमुखांना दसपट जादा पगार मिळत आहे. अरूंधती रॉय यांचे वार्षिक वेतन आहे २८.९६ लाख रूपये तर एचडीएफसीचे प्रमुख आदित्य पुरी यांचे वेतन आहे १० कोटी रूपये शिवाय स्टॉकमधून त्यांना ५७ कोटी रूपये मिळाले आहेत.

खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआयच्या अध्यक्षा चंदा कोचर यांचे वेतन २.६६ कोटी अधिक २.२ कोटींचा बोनस व२.४३ कोटींचे अन्य भत्ते असे आहे. अॅक्सिस बँकेच्या प्रमुख शिखा शर्मा यांना २.७० कोटी बेसिक वेतन शिवाय १.३५ कोटी रूपये इतर भत्ते स्वरूपात दिले गेले आहेत.यस बॅकेचे एमडी राजा कपूर यांचे वेतन ६.८ कोटी आहे. कपूर या बँकेचे प्रमोटरही आहेत.

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मागे बोलताना सार्वजनिक क्षेत्रातील बँक प्रमुखांना खासगी बँकांच्या तुलनेत अतिशय तुटपुंजे वेतन दिले जात असल्याचा मुद्दा मांडला होता व या कारणाने सर्वाजनिक बँकांमध्ये देशातील उत्तम टॅलंट येण्यास राजी होत नाही असेही स्पष्ट केले होते.

Leave a Comment