अझीम प्रेमजी यांची आतंरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड - Majha Paper

अझीम प्रेमजी यांची आतंरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड


न्यूयॉर्क – प्रसिद्ध भारतीय उद्योजक अझीम प्रेमजी यांची निवड दानशूरत्वासंबंधी देण्यात येणा-या अत्यंत मानाचा अशा जागतिक पातळीवरील कार्निगी पदकासाठी करण्यात आली आहे. त्यांनी भारतातील सरकारी शाळेसंबंधी व्यवस्थेत अमुलाग्र बदल घडवून आणण्यास दिलेल्या योगदानासाठी ही निवड करण्यात आली आहे.

२०१७साठीचा कार्निगी मेडल ऑफ फिलीऑनर्थोफी पुरस्कार अझीम प्रेमजी फाऊंडेशनचे संस्थापक असणा-या ७० वर्षीय अझीम प्रेमजी यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांनी दानत्वामध्ये दर्शवलेल्या अतुलनीय आणि संशोधनशील नेतृत्वाच्या सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. प्रेमजी यांनी विप्रोला जागतिक आस्थापनात परावर्तित करत असतानाच देशातील समाजिक विषमतेकडे लक्ष्य पुरविले. यासाठीच त्यांनी सरकारी शैक्षणिक संस्थाच्या आधुनिकीकरणासाठी बदल घडवून आणण्यास प्रारंभ केल्याचे कार्निगी कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आले. सात राज्यातील ३,००,००० शाळेसोबत मिळून अझीम प्रेमजी फॉऊडेशन कार्य करत आहे. अझीम प्रेमजीसोबतच चीनचे मेई-हिंग-चाक, अमेरिकेचे जेफ स्कॉल यांचीही या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

Leave a Comment