लेनोव्होने सादर केला कन्सेप्ट लॅपटॉप


जगात अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे इलेक्ट्राॅनिक्स विश्वात वेगाने बदल होत आहेत. याची चुणुक दाखविणारा फोल्डेबल संगणक किंवा लॅपटॉप लेनोव्होने अमेरिकेतील न्यूयॉर्क इव्हेंटमध्ये सादर केला आहे. अर्थात हा कन्सेप्ट लॅपटॉप आहे व प्रत्यक्षात त्याचे उत्पादन बाजारासाठी केले जाईल का नाही याविषयी कंपनीने अद्यापी कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र हे लॅपटॉप बाजारात आले तर पीसी व लॅपटॉप क्षेत्रात क्रांती घडवतील याची खात्री व्यक्त केली जात आहे.

या लॅपटॉपचा स्क्रीन वाकणारा म्हणजे फोल्डेबल आहे. हा स्क्रीन अर्धा वाकतो व लॅपटॉप फाईल प्रमाणे दिसतो. लॅपटॉपचा स्क्रीन की बोर्डच्या दिशेने वाकतो. या लॅपटॉपवरून गप्पा मारणे अथवा अन्य आवश्यक संभाषण करणे शक्य आहे. भविष्यातील लॅपटोपची झलक म्हणून याच्याकडे पाहिले जात आहे.

Leave a Comment