नासातर्फे अंतराळात जाणार भारतीय वंशाचे राजा चारी


नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने २०१७ च्या अंतराळ कार्यक्रमात भारतीय वंशाचे राजा चारी यांची अंतराळवीर म्हणून निवड केली आहे. कल्पना चावला व सुनिता विलियम्सनंतर नासातर्फे अंतराळात झेप घेणारे ते तिसरे भारतीय वंशाचे नागरिक आहेत. चारी त्यांच्या पत्नी व मुलांसह वॉटरलू येथे राहात आहेत मात्र त्याच्या कुटुंबातील अनेक जण आजही भारतात आहेत. या कुटुंबियांकडून चारी यांना शुभेच्या पाठविल्या जात आहेत. चारी यांचा जन्म मिलवॉकी शहरातला आहे व त्यांचे सर्व शिक्षणही अमेरिकेतच झाले आहे. ते एरॉनॉटिकल इंजिनिअ्रर आहेत.

राजा चारी अंतराळ मोहिमेतील निवडीसंदर्भात म्हणतात, हे मला एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटते आहे. २०१३ मध्येही त्यांनी अंतराळ मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न केला होता मात्र तेव्हा त्यांची निवड झाली नव्हती. भारतीय वंशाचे तसेच भारतीय युवांसाठी माझी निवड हे प्रोत्साहन ठरणार असेल तर त्याचे समाधान मोठे आहे असेही ते म्हणाले. मीही कुणाकडून तरी प्रेरणा घेतली आहेच असे सांगून ते म्हणाले, अंतराळ मोहिमेसाठी निवड हा माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण आहे.

राजा चारी अमेरिकन हवाई दलात लेफ्टनंट कर्नल पदावर आहेत. त्यांना एफ ३५, एफ१५, एफ१६, एफ१८ विमाने उडडाणाचा अनुभव आहे. नौसेनेत त्यांनी टेस्ट पायलट म्हणूनही काम केले आहे. त्यांची निवड झालेल्या टीममध्ये सात पुरूष व पाच महिलांचा समावेश आहे.

Leave a Comment