प्लॅस्टिक बाटल्यांमुळे औषधांना धोका?


औषधे ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिक बाटल्यांमुळे औषधांनाच धोका पोहचत आहे का, यावर संशोधन करण्याचे आदेश केंद्र सरकारने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला (आयसीएमआर) दिले आहेत. द्रव औषध प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये सुरक्षित आहे की नाही, हे शोधण्यासाठी आता आयसीएमआरला व्यापक सर्वेक्षण करावे लागणार आहे.

हैदराबादच्या राष्ट्रीय पोषण संस्थेला या बाबतची योजना तयार करून अभ्यास करण्याची सूचना आयसीएमआरने केली आहे.

खोकल्याचे औषध व अन्य द्रव औषधांमध्ये शिसे आणि अन्य विषारी पदार्थ असल्याचे गेल्या वर्षी सरकारने केलेल्या एका संशोधनात आढलून आले होते. दीर्घकाळ द्रव पदार्थ प्लॅस्टिक बाटल्यांत ठेवल्याने त्यातीत घातक पदार्थ त्या द्रवात उतरतात, असे त्या पाहणीत आढळले होते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अडीच वर्षांपूर्वी एक मसुदा तयार केला होता. त्यात औषधांची निर्मिती आणि त्यांच्या साठवणुकीसाठी प्लॅस्टिकचे ग्लास आणि पॉलीथीन टेरेफेथलेट (पीईटी) या बाटल्यांऐवजी काचेच्या बाटल्या वापरण्यास सांगितले होते, हे येथे उल्लेखनीय.