इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा


अंतराळात एकत्रित ३१ उपग्रहांचे यशस्वी प्रेक्षपण
नवी दिल्ली: आज (शुक्रवारी) एक मोठे आव्हान भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने लीलय पार केले आहे. श्रीहरिकोटा येथील लॉन्चपॅडवरून कार्टोसॅट- २एस उपग्रहासोबत ३० नॅनो उपग्रहांचे PSLV-C38च्या साह्याने प्रेक्षपण केले आहे. इस्रोचे अध्यक्ष एएस किरण कुमार हेही यावेळी उपस्थित होते. त्यांनी या यशासाठी सहका-यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच इस्रोकडून करण्यात आलेल्या स्पेसक्राफ्ट मिशन्सची संख्या आता ९० झाली आहे.

७१२ किलोग्रॅम वजनी कार्टोसॅट- २ या श्रॄंखलेतील उपग्रहासोबत २४३ किलोग्रॅम वजनाचे ३० अन्य नॅनो उपग्रह पॄथ्वीवर लक्ष ठेवण्यासाठी एकत्र प्रक्षेपित करण्यात आले. या उपग्रहाचे एकूण वजन ९५५ किलोग्रॅम एवढे असून या उपग्रहामध्ये भारतासोबतच ऑस्ट्रिया, बेल्जियम, चिली, चेक गणराज्य, फिनलॅंड, फ्रांस, जर्मनी, इटली, जापान, ब्रिटन आणि अमेरिकासहीत १४ देशांचे नॅनो उपग्रह आहेत.

अंतराळात गेल्यावर हे अंतरिक्ष यान स्पेसमध्ये फिरत असलेल्या मलब्यापासून वाचवणे ही प्राथमिकता असणार आहे. अंतराळात फिरणारा हा मलबा खूपच धोकादायक असतो. कारण यांचा वेग ३० हजार किमी प्रति तास असतो. उपग्रह अवकाश कक्षेत स्थिर झाल्यानंतर तो कार्यान्वित करण्याचे इस्त्रोचे मुख्य उद्दिष्टय असते तसेच अवकाश कच-यापासून आपल्या उपग्रहाला वाचवण्याचे सुद्धा इस्त्रोसमोर आव्हान असते. प्रत्येक उपग्रहाला एक ठराविक वर्षांचे आयुष्य असते. तितकीवर्ष तो उपग्रह कार्यान्वित राहतो. त्यानंतर निरुपयोगी बनलेला हा उपग्रह स्पेस डेब्रिस म्हणजे कचरा ठरतो. असेच बंद पडलेले उपग्रह, रॉकेटचे भाग, उपग्रहाचे तुकडे हा अवकाशात फिरणारा कचरा असतो.

Leave a Comment