जीएसटीच्या धक्क्याने स्वस्त झाली बुलेट


नवी दिल्ली : लोकप्रिय बाईक कंपनी रॉयल एनफील्डने त्यांच्या अनेक मॉडल्‍सच्या किंमतींमध्ये घट केली असून याबाबत मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनीकडून करण्यात आलेल्या एका व्यक्तव्यात म्हटले आहे की, भारतातील व्यवसाय जीएसटीमुळे बदलणार असल्यामुळेच रॉयल इनफिल्ड आपल्या ग्राहकांना ऑफर देणार आहे.

बजाज ऑटोने याआधीच आपल्या मॉडल्‍सच्या किंमतीत ४,५०० रुपयांची घट केली आहे. रॉयल एनफी‍ल्‍डचे प्रेसि‍डेंट रुद्रतेज सिंह यांनी म्हटले आहे की, भारतात जीएसटीमुळे बिझनेस बदलेल. यामुळे देशाची अर्थव्यवस्था आणि ग्राहकांना फायदा होणार आहे. रॉयल एनफी‍ल्‍ड जीएसटीचा फायदा त्यांच्या ग्राहकांना देणार आहे. १६ जून २०१७ पासून खरेदीवर ऑन रोड किंमत बदलली आहे. बुलेट ३५० ची किंमत १.१३ लाख रुपये आहे. ऑन रोड किंमतीवर ३ ते ४ हजारांची घट केली आहे. ही किंमत ट्वीन स्पार्क आणि इलेक्ट्रा या दोनही मॉडलवर लागू होणार आहे. तर क्लासिक ३५०ची किंमत १.३५ लाख रुपये आहे त्याच्या किंमतीतही ३ ते ४ हजारांची सूट दिली आहे. थंडरब्रिड ३५० ची किंमत १.६१ लाख रुपये आहे. त्याच्या किंमतीत ७००० हजारांची सूट दिली आहे.

Leave a Comment