सलग तीन दिवस बंद राहणार बँका


नवी दिल्ली – बँकेच्या संबंधित काही काम तुम्हाला जर करायचे असेल तर शुक्रवारपर्यंत करुन घ्या नाहीतर मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. बँकांना सोमवारी ईद असल्यामुळे सुट्टी असणार आहे. तर शनिवारी या महिन्यातील चौथा शनिवार असल्यामुळे बँकांना २४ जून रोजी सुट्टी असणार आहे आणि त्यानंतर २५ जून रोजी रविवार असल्याने बँकांना सुट्टी आहे.

बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत आणि सोमवारी ईद असल्यामुळे नागरिकांची खरेदीसाठी बाजारात गर्दी होणार असल्यामुळे एटीएममध्ये पैसे काढणा-यांची संख्याही वाढण्याची शक्यता असल्यामुळे एटीएममध्ये पैशांची कमतरता भासू शकते. बँकांच्या मते, पुरेसे पैसे एटीएममध्ये उपलब्ध करुन दिले जातील. तसेच सध्या नागरिक कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देत असल्यामुळे रोकडची समस्या निर्माण होण्याची शक्यता कमीच आहे. यासोबतच लहान व्यापा-यांनीही डिजिटल व्यवहारांना प्राधान्य दिले आहे.

Leave a Comment