पीएफधारकांना घर खरेदीसाठी मिळणार २.६७ लाखांची सबसिडी - Majha Paper

पीएफधारकांना घर खरेदीसाठी मिळणार २.६७ लाखांची सबसिडी


नवी दिल्ली – आता घर खरेदी करताना ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या सदस्यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सबसिडी मिळणार असून ईपीएफओ सदस्यांना प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) अंतर्गत २.६७ लाख रुपयांपर्यंतची सबसिडी मिळणार आहे. यासंदर्भात ईपीएफओने बुधवारी हाऊसिंग अँड अरबन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसोबत करार केला आहे.

ईपीएफओ सदस्यांना या करारानुसार हाऊसिंग स्किमच्या फायद्यांसोबतच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मिळणा-या सुविधांचाही लाभ मिळणार असल्यामुळे ईपीएफओ सदस्यांना घर खरेदी करणे सोपे होणार आहे. इपीएफओचे केंद्रीय भविष्य निधी कोष आयुक्त यांनी सहमती करारावर स्वाक्षरी केली आहे.

घर खरेदी करण्यासाठी ईपीएफओ सदस्य आपल्या पीएफ खात्यातून ९०% पर्यंत रक्कम काढू शकणार आहेत. यासाठी ईपीएफ अँक्ट १९५२मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. यासाठी जरूरी आहे की, पीएफ खातेधारकाचे अकाऊंट कमीत कमी तीन वर्ष जुने असावे. पीएफ खातेधारक या स्कीम अंतर्गत आपल्या पीएफमधून होम लोनचा हफ्ता देऊ शकणार आहेत. पीएफ खातेधारकास यासाठी आपल्या रिजनल पीएफ ऑफीसमध्ये अप्लाय करावे लागणार आहे. रिजनल पीएफ कमिश्नर हे मेंबरच्या मंथली कॉन्ट्रीब्यूशनमधून होम लोनचा हफ्ता देण्याची परवानगी देतील. जर एखाद्या सदस्याच्या पीएफ खात्यातून होम लोनचा हफ्ता देण्या इतके पैसे शिल्लक नसतील तर त्यासाठी ईपीएफओ जबाबदार राहणार नाही.

Leave a Comment