अमेरिकेची मोदी दौर्‍यापूर्वीच उर्जा क्षेत्रासाठी ७५ लाख डॉलर्सची मदत


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अ्रमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या भेटीसाठी २५ जूनला अमेरिकेला रवाना होण्यापूर्वीच बुधवारी ट्रम्प प्रशासनाने भारताला पॉवर ग्रीड साठी ७५ लाख डॉलर्स म्हणजे ४८ कोटींची मदत जाहीर केली आहे. सहज परवडेल व खात्रीशीर उत्पादन होऊ शकेल अशी ग्रीड उभारण्यासाठी भारताला ३ कोटी डॉलर्स म्हणजे १९४ कोटी रूपयांची मदत देण्यात येणार असल्याचे ट्रम्प प्रशासनाने जाहीर केले होते त्याचाच हा भाग असल्याचे उर्जा सचिव रिक पॅरी यांनी सांगितले.

ते म्हणाले इलेक्ट्रीक ग्रीड संशोधनामुळे अमेरिका व भारत यांच्यात आर्थिक विकास व उर्जा संरक्षण क्षेत्रासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. मोदी अमेरिकेनंतर पोर्तुगाल, नेदरलँड येथेही जाणार आहेत व हे तिन्ही देश न्यूकिलअर सप्लायर्स ग्रुप म्हणजे एनएजीचे मेंबर आहेत. भारतालाही ही मेंबरशीप हवी आहे व त्यासंदर्भात मोदी या तिन्ही देशांच्या प्रमुखांना त्या संदर्भात पाठिंबा देण्याची विनंती करतील असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment