बॉक्सिंग रिंगमध्ये मुष्टयुद्ध खेळणारे खेळाडू, रिंगमध्ये कुस्ती करणारे पहिलवान आपण नेहमीच पाहतो. जपानच्या रॉबर्ट मॅकग्रेगर यांनी रिंगमध्ये कुस्ती करणारे रोबो तयार केले असून त्यांच्या कुस्तीचा व्हिडीओ यूट्यूबवर खूपच लोकप्रिय ठरला आहे. अवघ्या तीन दिवसांत १३ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
फायटिंग करणारे रोबो
यात एक दुसर्याला मात देण्यासाठी हे रोबो पूर्ण जोशात लढताना दिसत आहेत. ते हलके आहेत त्यामुळे त्यांचा हालचाली सहज होतात. स्टार पॅटर्न स्वरूपातील त्यांचे डिझाईन असे आहे की कोंबड्यांची झुंज असल्याचा भास त्यातून होतो. हे रोबो एकमेकांवर जोरदार वार प्रहार करतात, बचावासाठी उलट्यासुलट्या उड्या मारतात, खाली पडतात, एकमेकांचे वार चकवितात. त्यांच्या साठी खास रिंग तयार केली आहे. यांचे विशेष म्हणजे त्यांची फाईट कंट्रोल करता येत नाही त्यामुळे ती थांबवायची असेल तर त्यांचे कनेक्शन काढावे लागते.