थायलंडविषयी हेही जाणून घ्या


थायलंड हा जगभरातील पर्यटकांचा आवडता देश आहे. थायलंडचे नुसते नांव काढले की तेथील सुंदर समुद्र किनारे, मौज मजा, थाई मसाज व थाई फूड यांच्या आठवणी जाग्या होतात. मात्र थायलंड म्हणजे एवढेच नाही तर त्याहूनही अधिक कांही आहे. यांची माहिती जाणून घेणे मस्ट आहे. थायलंडमध्ये पर्यटन हा मोठा व्यवसाय आहे.

थायलंड आणि भारत यांचे प्राचीन काळापासून संबंध आहेत. आजही येथे हिंदू मंदिरे मोठ्या संख्येने आहेत तसेच अनेक देवळांचे अवशेषही येथे पाहायला मिळतात. भारताचे रामायण थायलंडमध्येही आहे मात्र तेथे ते थाई भाषेत आहे व त्याला रामकीन म्हटले जाते. याला महाग्रंथाचा दर्जा दिला गेला आहे. थायलंडची राजधानी बँकॉक हिचे मूळ नांव एकादमात घेणे अशक्य आहे. हे नांव आहे कुंग देवमहानगर अमररत्नकोसिन्द्र महिन्द्रायुध्या महातिलकभव नवरत्नराजधानी पुरीरम्प उत्तमराजनिवेशन महास्थान अमरविमान अवतारस्थित्य शक्रदत्तिय विष्णुकर्मप्रसिद्धी. हे नांव संस्कृत व पाली भाषेत आहे.


थायलंडचा अर्थ आहे स्वतंत्र जमीन. येथील फुकेट व फीफी ही पर्यटनस्थळे पर्यटकांची विशेष आवडती व मौजमजेची आहे. मात्र थायलंडमधील लोक स्वभावाने धार्मिक आहेत. येथील घरे, दुकानांबाहेर छोटी मंदिरे असतात व तेथे परंपरेनुसार पूजा केली जाते. थायलंडमध्ये हिंदू मंदिरांची गर्दी असून त्यात गणेश, शंकर, पार्वती, गरूड यांच्या मूर्ती आढळतात. येथेही देवासमोर दिवे, मेणबत्त्या लावल्या जातात. थाई लोक हात जोडून नमस्कार करतात. दुकानदार ग्राहकांना वस्तू खरेदी केल्यानंतर दोन्ही हात जोडून नमस्कार करतात.


हा देश बौद्धधर्मी आहे. आणखी एक वैशिष्ठ म्हणजे येथे पांढरे हत्ती आढळतात.तसेच सर्वात मोठा रेटीकुलेटेड पायथन म्हणजे अजगर येथेच सापडतो. हे दोन्ही प्राणी जगात अन्यत्र आढळत नाहीत. येथे राजाला ईश्वराचा मान दिला जातो. थाई लोक डोके हा शरीराचा सर्वात पवित्र अवयव मानतात.

Leave a Comment