कार्बनचा ऑरा नोट २ फॅशन आय अॅपसह सादर


स्वदेशी स्मार्टफोन निर्माती कंपनी कार्बनने त्यांचा नवा हँहसेट ऑरो नोट दोन लाँच केला असून हा फोन इनबिल्ट फॅशन आय अॅपसह दिला गेला आहे. त्याची किंमत ६४९० रूपये असून तो कॉफी शँपेन व ब्लॅक शँपेन अशा दोन कलरमध्ये उपलब्ध आहे.

कंपनीचे कार्यकारी संचालक शशीन देवसरे या संदर्भात म्हणाले आजच्या युवा पिढीकडून फॅशन व ऑनलाईन शॉपिंगला वाढता प्रतिसाद मिळतो आहे. युजर्सना फॅशन व ऑनलाईन शॉपिंगचा नवा अनुभव घेता यावा यासाठी या फोनमध्ये फॅशन आय अॅप दिले गेले आहे. हा फोन अत्यंत स्पर्धात्मक किंमतीत उपलब्ध आहे व ग्राहकांसाठी फॅशन सहज सोपी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे नवे तंत्रज्ञान आहे.

अन्य फिचर्समध्ये ५.५ इंची एचडी डिस्प्ले,,२ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी ती मायक्रोकार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, अँड्राईड नगेट ७.० ओएस यांचा समावेश आहे. त्याला १३ एमपीचा रियर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह दिला गेला आहे तर फ्रंट कॅमेरा ५ एमपीचा आहे. हा ड्युअल सिम फोर जी फोन आहे.

Leave a Comment