शेअर बाजारात पुणे महापालिकेच्या बॉन्डची नोंदणी


मुंबई – पुण्यात आगामी ५ वर्षात पाणी पुरवठा प्रकल्पासाठी निधी उभा करण्यात येणार असून महापालिकेच्या बॉन्डची त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेअर बाजारात नोंदणी करण्यात आली. पुणे महापालिकेचा या बॉन्डच्या माध्यमातून २२६४ कोटी रुपये उभे करण्याचा प्रयत्न आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, एसबीआयच्या अरुंधती भट्टाचार्य आणि सेबीचे पदाधिकारी बीएसईमधील या कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नायडू आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकाळी ९.१५ वाजता शेअर मार्केट रिंग वाजवून केले.

Leave a Comment