पॅन, आधार आणि यूएएनमध्ये तफावत असल्यास काढता येणार नाही पीएफ !


नवी दिल्ली : ऑनलाइन पीएफ पॅन, आधार आणि यूएएन (यूनिव्हर्सल अकाउंट नंबर) यांच्या माहितीत काही फरक असल्यास काढता येणार नाही. ऑनलाइन पीएफ काढण्याची सुविधा असूनही अनेक कर्मचाऱ्यांना त्यामुळेच पीएफ ऑफिसमध्ये जावे लागेल.

ईपीएफओच्या वेबसाइटवर ऑनलाइन पीएफ काढण्यासाठी केवायसी अपलोड करावे लागते. खातेधारकांना बँक अकाउंट क्रमांक, पॅन, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स, मतदान कार्ड आदी माहिती वेबसाइटवर द्यावी लागते. पण ही माहिती देताना काही खातेधारकांच्या पॅन आणि आधार कार्ड यात नावात वा अन्य माहितीत फरक असल्यास ती माहिती स्वीकारली जात नसल्यामुळे ऑनलाइन पीएफही काढता येत नाही.

याचे मुख्य कारण ईपीएफओच्या टेक्निकल डिपार्टमेंटचे राजेश पिल्लई यांनी सांगितले की, यूएएन, पॅन आणि आधार यांची माहिती एकमेकांशी मिळतीजुळती असायला हवी. अन्यथा सीस्टिम ही माहिती स्वीकारत नसल्यामुळे ईपीएफओच्या वेबसाइटवर केवायसी अपलोडही करता येणार नाही.

ईपीएफओने ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी अहमदाबादच्या कार्यालयात आधार केंद्र उघडले आहेत. जर आधार, पॅन यावर आपले नाव एकसारखे नाही, तर आधार कार्ड घेऊन आपण एखाद्या सेंटर्सवर जाऊ शकता. आपले बायोमेट्रिक तपासून या माहितीत बदल करून दिले जातात. सध्या ईपीएफओच्या मनीनगर, नरोडा आणि आयकर कार्यालयांमध्ये ही सुविधा दिली जाते. ईपीएफओ लवकरच यासाठी शहरांमध्ये शिबिरे आयोजित करणार आहे.

Leave a Comment