बहुप्रतिक्षीत ‘वनप्लस ५’ भारतात होणार आज लॉन्च


मुंबई: वनप्लसचा गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चेत असलेला वनप्लस ५ हा स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार असून हा स्मार्टफोन अमेरिका, युरोपमध्ये लॉन्च झाला आहे. पण आज सायंकाळी साडे चार वाजता भारतात याचे लॉन्चिंग होणार आहे. हा स्मार्टफोन डिझाईन, परफॉर्मन्स, बॅटरी, कॅमेरा इत्यादी सर्वच गोष्टींवर अधिक लक्ष देऊन तयार करण्यात आला आहे.

‘वनप्लस ५’ची अमेरिकेतील स्मार्टफोन बाजारात किंमत सुमारे ३१ हजार रुपये आहे. हा स्मार्टफोन तिथे २७ जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. पण भारतात मात्र आज हा फोन लॉन्च होणार असून, भारतातील किंमत ३२ हजार ९९९ रुपये असण्याची शक्यता आहे.आयफोन ७शी मिळता-जुळता असणाऱ्या या स्मार्टफोनची बॉडी मेटलमध्ये आहे. वनप्लसचा आतापर्यंतचा हा सर्वात स्लीम स्मार्टफोन आहे. २ सेकंदात स्मार्टफोन अनलॉक करण्याची क्षमतेचे फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

‘वनप्लस 5’मध्ये ५ इंचाची स्क्रीन (१९२०×१०८० पिक्सेल रिझॉल्युशन), 5D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन ५, ४५GHz ऑक्टा कोर क्लावकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर, ८ जीबी रॅम, १२८ जीबी इंटरनल मेमरी, अँड्रॉईड ७.१ नॉगट (ओएस ऑक्सिजन), १६ मेगापिक्सेलचा रिअर आणि २० मेगापिक्सेलचा टेलिफोटो त्याचबरोबर १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा (f/2.0 अपॅरचर) देण्यात आला आहे. यात ३३०० mAh क्षमतेची नॉन-रिमोव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी ३० मिनिटात ६० टक्के चार्ज होते.

Leave a Comment