इस्रोच्या ३१ उपग्रहांचे काउंटडाऊन सुरू - Majha Paper

इस्रोच्या ३१ उपग्रहांचे काउंटडाऊन सुरू


चेन्नई – उपग्रह कार्टोसॅट हे भारतीय हवामानाचे निरीक्षण करण्यास अवकाशात सोडण्यात येणार असून यासोबत अन्य ३० उपग्रहसुद्धा अवकाशात झेप घेणार आहेत. हे ३१ उपग्रह शुक्रवारी सकाळी अवकाशात सोडण्यात येणार असून या मोहिमेचे २८ तासांचे काउंटडाऊन सुरू झाले आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने दिली.

अवकाशात सोडण्यात येणाऱ्या या उपग्रहांपैकी कार्टोसेट हे भारतीय उपग्रह असून अन्य ३० उपग्रह हे परदेशी आहेत. हे उपग्रह अवकाशात पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकल (पीएसएलव्ही) च्या मदतीने झेप घेणार असून कार्टोसॅट-२ सीरीज या उपग्रहाचे वजन ७१२ किलोग्राम आहे. सकाळी ९ वाजून २९ मिनिटांनी पीएसएलव्ही या प्रक्षेपकामार्फत हे ३१ उपग्रह एकाचवेळी अंतराळात प्रक्षेपण करणार आहेत.

Leave a Comment