मिसकॉल द्या- मोबाईल रिचार्ज करा


आज मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला असला तरी अनेकदा गरज असेल तेव्हा नेमका चार्ज संपलेला असणे व अशावेळी जवळ रिचार्जचा कोणताही ऑप्शन नसणे हा प्रसंग अनेकांवर येतो. ही गरज लक्षात घेऊन एक मिस कॉल द्यायचा व फोन त्वरीत रिचार्ज करायचा अशी सेवा सुरू झाली आहे. यासाठी मोबाईल वॉलेट, स्मार्टफोन अथवा कोणत्याही अॅपची गरज नाही. मात्र ही सेवा घेण्यासाठी तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असणे बंधनकारक आहे. ही सेवा घेऊन १० रूपयांपासून ५०० रूपयांपर्यंत रिचार्ज करण्याची सुविधा दिली गेली आहे.

मोबाईल रिचार्ज करण्याची वेळ आली तर ग्राहकाने ७३०८०८०८०८ या नंबरवर मिसकॉल द्यायचा आहे. अॅक्टीव्हेट करण्यासाठी मेसेज बॉक्स मध्ये जाऊन एसीटी ही इंग्रजी अक्षरे टाईप करून स्पेस द्यायची. त्यानंतर मोबाईल ऑपरेटरचे नांव टाकून पुन्हा स्पेस द्यायची व बँकेचा अकौंट नंबरचे शेवटचे पाच आकडे भरायचे व हा मेसेज पाठवायचा. बँकेकडून अॅकटीव्हेटचा मेसेज आला की कितीचा रिचार्ज करायचा तो आकडा टाकून मिस कॉल द्यायचा. रिचार्जचे पैसे तुमच्या खात्यातून वळते केले जाणार आहेत व बँकेत बॅलन्स नसेल तर रिचार्ज होणार नाही. ही सेवा १ दिवसात एकाच मोबाईल नंबरसाठी उपलब्ध केली गेली आहे. ही सेवा घेण्यासाठी डेटा खर्च करण्याची गरज नाही म्हणजेच त्यासाठी इंटरनेट, अॅप, वॉलेट नको तसेच स्मार्टफोनचीही गरज नाही. फिचर फोनवरूनही ही सेवा घेता येणार आहे.

Leave a Comment