होंडाची क्लिक स्कूटर चार रंगात आली


होंडा मोटर अॅन्ड स्कूटर इंडियाने भारतीय बाजारात ११० सीसीची क्लिक ही स्कूटर सादर केली असून ती चार रंगात उपलब्ध करून दिली गेली आहे. या स्कूटरची दिल्ली बाजारातील किंमत आहे ४२४९९ रूपये. मंगळवारी रात्री एका कार्यक्रमात ही स्कूटर सादर करण्यात आली.

या विषयी बोलताना कंपनीचे प्रमुख मिनोस कातो म्हणाले भारतीय बाजारात १०० व ११० सीसी ऑटोमेटिक स्कूटर्सना प्रचंड मागणी असून त्यात वाढच होत आहे. आमची नवी क्लिक चालकाला अधिक आराम व सुविधा देऊ शकेल या प्रकारे तयार केली गेली आहे. कंपनीचे उपाध्यक्ष यादवेंद्र सिंग यांच्या म्हणण्यानुसार चार रंगात सादर केलेली ही स्कूटर वजनाला हलकी आहे. तिची सीट लांब रूंद असल्याने चालकचा प्रवास आरामदायी होणार आहे. या स्कूटरचे उत्पादन राजस्थानच्या अलवारा जिल्ह्यातील टपूकडा येथील कंपनीच्या कारखान्यात केले जात असून संपूर्ण देशभर ही स्कूटर टप्प्याटप्प्याने बाजारात आणली जाईल.

Leave a Comment