ही कोंबडी २४ तासात देते तब्बल ३ डझन अंडी


जयपूर – एक कोंबडी सामान्यत: एका वेळेस २ किंवा ३ अंडी देते हे तर आपल्याला माहीतच आहे. पण, आम्ही आज तुम्हाला अशा एका अशा कोंबडीबाबत सांगणार आहोत जे ऐकल्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. कारण, एका कोंबडीने २४ तासांत तब्बल ३ डझन अंडी दिल्याचे वृत्त समोर आले आहे. याला कुणी चमत्कार म्हणत आहे तर कुणी जादू, पण ज्या-ज्या व्यक्तीने हे पाहिले आहे त्याला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसला आहे.

राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर येथे एका कोंबडीने एक दिवसात तब्बल ३ डझन अंडी दिली आहेत. याबाबतचे वृत्त राजस्थान पत्रिकाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, घाटगेटमध्ये एका रईस नावाच्या व्यक्तीने दावा केला आहे की, त्याच्या कोंबडीने २४ तासांत ३६ अंडी दिली आहेत. संपूर्ण परिसरात वा-याच्या वेगाने कोंबडीने ३६ अंडी दिल्याचे वृत्त पसरल्यानंतर नागरिकांनी हा चमत्कार पाहण्यासाठी तोबा गर्दी केली. रईस खान नावाच्या या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी बाजारातून एक कोंबडी खरेदी केली होती. त्यानंतर एके दिवशी रईसला कामानिमित्त बाहेर जायचे असल्याने त्याने कोंबडीला एका रुममध्ये बंद केले आणि तो निघून गेला.

पण रईस ज्यावेळी घरी परतला त्यावेळी त्याने जे काही पाहिले त्यामुळे त्यालाही आश्चर्याचा धक्काच बसला. त्या कोंबडीने १२ अंडी दिली होती. हे पाहून रईसला धक्का बसला पण पूढील २४ तासांमध्ये त्याच कोंबडीने पून्हा २४ अंडी दिली. म्हणजेच एकूण मिळून या कोंबडीने ३६ अंडी दिली. हा चमत्कार आहे की आणखीन काही हे माहिती नाही मात्र, हा सर्व प्रकार पाहण्यासाठी नागरिक एकच गर्दी करत आहेत.