हैद्राबादेत १ हजार वायफाय स्पॉट कार्यान्वित


तेलंगणाची राजधानी हैद्राबाद येथील वायफाय प्रोजेक्ट अंतर्गत वायरलेस नेटवर्क सुरू झाले असून पहिल्या टप्प्यात १ हजार हॉटस्पॉट तयार केले गेले आहेत. येथे युजरला मोफत इंटरनेट सुविधा दिली जात आहे. या प्रकल्पांतर्गत शहरात ३ हजार स्पॉट बनविले जाणार आहेत. सध्या कार्यान्वित केलेल्या हॉटस्पॉट जागांवर ५ ते १० एमबीपीएस वेगाने ३० मिनिटांसाठी मोफत वायफाय मिळणार आहे.

राज्याच्या आयटी विभागाचे सचिव जयेश रंजन म्हणाले, शहरात ३ हजार जागा वायफायसाठी निश्चित केल्या गेल्या आहेत. पैकी १ हजार हॉटस्पॉट सुरू झाले आहेत व उर्वरित येत्या तीन महिन्यात सुरू होतील. यासाठी ३०० कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. हा पैसा उद्योग जगताकडून गुंतविला जात आहे. जून २०१५ मध्ये डिजिटल तेलंगणा अंतर्गत सरकारने पायलट प्रोजेक्ट लाँच केला होता. तो यशस्वी झाल्यामंतर पुढे वरंगळ, करीमनगर व खम्मान जिल्ह्यांमध्येही हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. वायफायचा गैरवापर होऊ नये व सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षा उपाय योजले जात असून त्यासाठी या क्षेत्रातील कंपन्यांचे सहकार्य घेतले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment