मे महिन्यात हवाई प्रवाशांनी नोंदविले रेकॉर्ड


भारतात मे महिन्यात हवाई प्रवास करणार्‍यांनी रेकॉर्ड नोंदविले असून स्थानिक विमान प्रवाशांची संख्या या महिन्यात सर्वाधिक म्हणजे १ कोटींचा आकडा पार करून गेली आहे. विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा म्हणाले , या संदर्भात डायरेक्टरेट ऑफ सिव्हील एव्हीएशनने प्रत्येक महिन्यातील प्रवासी संख्येची आकडेवारी सादर केली आहे. गेल्या वर्षात मे महिन्यात ८६.६९ लाख प्रवाशांनी हवाई प्रवास केला होता. या वर्षात हीच संख्या मे महिन्यात १०१.७४ लाखांवर गेली आहे.

जानेवारी ते मे या महिन्यात विमान प्रवाशांची संख्या ४ कोटी ६५ लाखांवर असून इंडिगोने सर्वाधिक म्हणजे ४१.९१ लाख प्रवाशांची नेआण केली आहे. त्याखालोखाल जेट एअरवेजने १५.५१, एअर इंडियाने १३.२३, स्पाईस जेटने १२.७९, गो एअरने ८.६४, विस्ताराने ३.३४, एअर एशियाने ३.३२ लाख प्रवाशांची नेआण केली आहे. जगात स्थानिक विमान प्रवासात भारत तीन नंबरचे मार्केट बनले आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून दोन नंबरवर चीन आहे.

Leave a Comment