पाकिस्तानातील स्वर्ग पस्सू


दहशतवादाला खतपाणी घालणारा, हिंसाचारसाठी जगभर चर्चेत असलेल्या पाकिस्तानने चँपियन ट्राॅफी जिंकल्यानंतर सोशल मिडीयावर पाकिस्तानचे खूपच कौतुक होऊ लागले आहे. मात्र पाकिस्तानात अशाही अनेक सुंदर गोष्टी आहेत, की ज्यांची चर्चा फारशी होत नाही. त्यातील एक आहे पाकिस्तानचा स्वर्ग मानले जाणारे पस्सू हे छोटेसे गांव. पाकिस्तानातील अशांततेच्या पार्श्वभूमीवर हे गांव व तेथील नागरिक अतिशय शंाततेत व अप्रतिम निसर्गाच्या सानिध्यात जगत आहेत, येणार्या पर्यटकांचे दोन्ही बाहू फैलावून आगतस्वागत करत आहेत. जे पर्यटक या गावाला भेट देऊन आले, त्यांनी तेथील एकापेक्षा एक सुंदर फोटो शेअर केले आहेत.


पाकिस्तानातील परिस्थितीच्या विपरित येथील राहणीमान आहे. येथे महिलांना पूर्ण स्वातंत्र्य असून आपला जोडीदार त्या स्वतः निवडू शकतात. काराकोरम पर्वतरांगातील गिलगिट बाल्टिस्तान हायवेवर हे छोटेसे टुमदार गाव वसले आहे. येथील लोक वाखी भाषा बोलतात व ते मूळचे पार्शियन असल्यचे सांगितले जाते. ते इस्मैली धर्माचे पालन करतात. दुर्गम जागी हे गांव असूनही तेथे शिक्षणाबाबत चांगली जागृती आहे.


उंच पहाड, खळाळत्या नद्या, हिमनद्या यांच्या सहवासात राहणारे येथील लोक परंपरावादी आहेत. त्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून महिलाही शेतीकामात सक्रीय आहत. पर्यटकांचे हे आवडते स्थळ होते त्यामुळे छोट्याशा गावात अनेक हॉटेल्स होती. मात्र अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर येथे येणार्‍या पर्यटकांची संख्या रोडावली. त्यामुळे अनेकांना हॉटेल्स, जीप्स विकाव्या लागल्या व अन्य व्यवसाय शोधावे लागले. आता मात्र परिस्थिती निवळत चालली आहे व पर्यटक पुन्हा एकदा या स्वर्गीय गावाकडे येऊ लागले आहेत.

Leave a Comment