पीजी बुगाटीची लाखमोलाची सायकल


फ्रान्समधील सुपर कार मेकर बुगाटी ने लग्झरी बाईक बनविणार्‍या पीजी कंपनीसह तयार केलेली सायकल बाजारात आणली असून ही लिमिटेड एडिशन सायकल आहे. तिची ६६७ युनिट बनविली जाणार आहेत. या सायकलची किंमत ३९ हजार डॉलर्स म्हणजे २५ लाख रूपये असून भारतात मिळणार्‍या एंट्री लेव्हल लग्झरी कार्सपेक्षाही ती अधिक आहे.

या सायकलसाठी वापरलेले ९५ टक्के मटेरियल म्हणजे फ्रेम, फोक, रिम्स, हँडलबार, सीट, ब्रेक्स उत्तम कार्बन फायबरपासून बनविले गेले आहेत. त्यांचे डिझाईन जर्मनीने केले आहे. ग्राहक सायकलचे लेदर व पेंट त्यांच्या आवडीनुसार बदलू शकणार आहेत. ही सायकल स्पोर्ट रायडिगसाठीच बनविली गेली असून ती फक्त ११ पौंड म्हणजे ४ किलो वजनाची आहे. यामुळे ती चालविणे सहजसोपे जाते. सायकलचे डिझाईन सुपरकार प्रमाणे ऑप्टीमल एअरोडायनामिक्स लक्षात घेऊन केले गेले आहे परिणामी ती वेगाने चालविता येते. सायकलला शॉक अॅब्झॉर्बर बार आहेत यामुळे खडबडीत रस्त्यांवरून अथवा खड्ड्यातून गेली तरी चालविणार्याअला हादरे बसत नाहीत.

Leave a Comment