२२ जूनला लॉन्च होणार वनप्लस ५


मुंबई: २२ जून रोजी दुपारी २ वाजता लॉन्च होणा-या वनप्लस ५ स्मार्टफोनची बरीच माहिती समोर आली असून या स्मार्टफोनच्या कंपनीने काही जाहीरातीही केल्या आहेत. वनप्लस ५ ला कंपनी एक फ्लॅगशिप ब्रॅन्ड सांगत आहे. या स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असणारे ग्राहक कंपनीच्या वेबसाईटवर oneplusstore.in/launch2017 या लिंकवर लॉन्चिंग बघू शकतात. त्यासोबत तुमचा फोन नंबरही रजिस्टर करू शकता. यातून वनप्लस ५ हा स्मार्टफोन जिंकण्याचीही संधी आहे.

अद्याप या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. पण काही रिपोर्टनुसार, वनप्लस ५ रॅम आणि स्टोरेजनुसार दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये येणार आहे. या स्मार्टफोनच्या एका व्हेरिएंटची किंमत ३२९९९ रूपये तर दुस-या व्हेरिएंटची किंमत ३७९९९ असू शकते. या स्मार्टफोनची अधिकॄत किंमत लॉन्चिंगच्या दिवशी जाहीर केली जाईल.

या स्मार्टफोनच्या प्रोसेसरची माहिती वनप्लसने आधीच जाहीर केली आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट Qualcomm Snapdragon 835 SoC प्रोसेसर दिला आहे. वनप्लस ५ च्या डायमेंशन्सबाबत खुलासा केला आहे. त्यात हा स्मार्टफोन सर्वात स्लिम असल्याचे सांगण्यात आले आहे. वन प्लसने ट्विटरवर या स्मार्टफोनचा लेटेस्ट टिझर पोस्ट केलाय. त्यात ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर ३३००mAh पॉवर असलेली बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच डिस्प्ले, १९२०x१०८० रिझोल्यूशनसोबत मिळणार आहे. यात ६ किंवा ८ जीबी रॅम १२८ जीबी इंटरनल मेमरीचे ऑप्शन असू शकते. २० मेगापिक्सल आणि १६ मेगापिक्सल सेंसर्स असलेला डुअल लेंस कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये आहे.

Leave a Comment