मोटो सी प्लस भारतात लाँच


आपल्या नव्या आणि सर्वात स्वस्त अशा स्मार्टफोनला आज मोटोरोलाने भारतात लाँच केले आहे. या नव्या स्मार्टफोनचे नाव मोटी सी प्लस असे आहे. मोटोरोलाने या अगोदरच भारतात मोटो झेड२ देखील लाँच केला आहे. हा स्मार्टफोन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असून ६९९९ रुपये ऐवढी या स्मार्टफोनची किंमत आहे.

हा स्मार्टफोन २० जूनपासून दुपारी १२ वाजल्यापासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. लाँच झाल्याच्या आनंदात कंपनीने २४ ते २६ जून दरम्यान या कंपनीने कंपनीने २०% सूट दिली आहे. त्यामुळे फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. शाओमीच्या रेडमी ४शी या स्मार्टफोनची स्पर्धा असणार आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोटोरोलाने रिलायन्स जिओशी देखील करार केला आहे. मोटो सी प्लसच्या खरेदीवर रिलायन्स जिओकडून ३० जीबी अतिरिक्त ४जी डेटा मिळणार आहे.

५ इंच एचडी ७२० पिक्सल डिस्प्ले मोटो सी प्लसमध्ये आहे. तर या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड ७.० नॉगट ऑपरेटिंग सिस्टम असणार आहे. तसेच यामध्ये रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सल तर फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सल असणार आहे. यामध्ये १.३ गीगाहर्त्झ क्वॉड कोअर प्रोसेसर देण्यात आले आहे. तसेच यात २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल मेमरी आहे. एसडी कार्डच्या मदतीने मेमरी वाढवताही येऊ शकते. मोटो सी प्लसमध्ये ४००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामधील इतर फीचर हे मोटो सी प्रमाणेच आहेत.

Leave a Comment