पाकिस्तानचा गोल्ड मॅन जाफर सुपारी


भारतात रमेश वांजळे, दत्तात्रय फुगे हे अंगावर घालत असलेल्या सोन्यामुळे जसे चर्चेत होते तसाच एक गोल्डमन पाकिस्तानातही असून त्याचे नांव आहे जाफर सुपारी. रावळपिंडी येथील हा उद्योजक अंगावर नुसते भरभक्कम सोनेच घालत नाही तर अनेक लग्झरी कार्सचा ताफाही त्याच्या तैनातीत आहे. हा गोल्डमन त्याचे फोटो सतत सोशल मिडीयावर अपडेट करत असतो.

जाफर सुपारी प्रथम चर्चेत आला त्याला कारण घडले ते त्याच्या भावाचे लग्न. भावाच्या लग्नात त्याने ५०० आलिशान कार्सचा ताफा रस्त्यावर उतरविला होता तसेच रस्त्यावर नोटांची उधळण करण्यासाठी खास लोक नेमले होते. तेव्हापासून तो सोशल मिडीयावर सेलिब्रिटी बनला असून त्याचे लक्षावधी फॉलोअर्स आहेत. त्याच्या रक्षणासाठी तीन बॉडीगार्ड तैनात केले गेले आहेत. जाफर म्हणतो, श्रीमंतीचा त्याला गर्व नाही. सोशल मिडीयावर फोटो शेअर करण्यामागे लोकांशी संपर्कात असावे असाच त्याचा हेतू आहे. तो श्रीमंत नसता तरीही तो सोशल मिडीयावर अॅक्टीव्ह राहिलाच असता असेही तो सांगतो.

Leave a Comment